WHAT’s happening

Diverse Animal Exhibition

भव्य देशी पशु प्रदर्शन - सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव, सिद्धगिरी मठ

पृथ्वीवरील विविध प्रकारच्या सजीव प्राणी  हजारो वर्षांपासून मानवीय  इतिहासाचा अविभाज्य भाग राहिले आहेत.   शिकार करणे व अन्न गोळा करणे, शेती करणे व प्राण्यांना माणसाळविणे (पशुपालन) या प्रत्येक टप्प्यावर मानवी संस्कृतीची प्रगती होताना प्राणी वेगवेगळ्या प्रकारे माणसाच्या आयुष्याशी निगडित झाले होते. परस्पर कृतज्ञता भाव हे या सहजीवनाचे इंगित होते. या परस्पर अवलंबित्व असणाऱ्या प्राणीजीवनावरही मानव मागील काही काळापासून अतिक्रमण करत आहे. अधिक दूध मिळवण्यासाठी संकरित पशुपालन असो वा प्राण्यांच्या  अधिक प्रजननासाठी केलेले अनैसर्गिक उपाय असोत कि प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास आक्रमित करणे असो. माणूस प्राण्यांबद्दलचे प्रेम विसरून त्यांना गुलाम म्हणून वागवू लागला आहे. यातून निसर्गातील सहजीवन असंतुलित होत आहे. जर निसर्गाचा समतोल  व मानवीय संस्कृती जर टिकवायची असेल तर प्राणी-संस्कृती टिकणे गरजेचे आहे. 

याही काळात अनॆक पशुपालक पशूंप्रती  अत्यंत कृतज्ञता भाव ठेवून  पशुपालन करीत आहेत. अश्याच पशुपालकांना जगापुढे आणून त्यांचा आदर्श जगासमोर आणून इतरांना प्रेरित करण्यासाठी सिद्धगिरी सुमंगलम २०२३ मध्ये आपण विविध पशुपालन स्पर्धा आयोजित करीत आहोत .

Gallery

अटी व नियम 

  • सर्व जनावरांच्या प्रत्येक गटामध्ये कमीत कमी 10 स्पर्धक असणे आवश्यक आहे अन्यथा दोन गट एकत्र केले जातील किंवा बक्षिसाची रक्कम कमी केली जाईल. 
  • जनावरांच्या प्रत्येक गटांमधून प्रथम क्रमांक आलेल्यांची पुन्हा परीक्षण करून एक सर्वोतम म्हणून निवडला जाईल.
  • एखादे जनावर सर्वोत्कृष्ट म्हणून निवडले गेले तर त्यांना त्या गटाचे प्रथम बक्षिस दिले जाणार नाही.
  • व्यवस्थापन कमिटीने नेमून दिलेल्या जागेतच जनावरे बांधणे बंधनकारक आहे. 
  • गाई, म्हैस, शेळी, अश्व, गाढव, श्वान व मांजर यांची जात ठरविण्याचे अंतिम अधिकार हे निवड समिती कडे असतील. 
  • एका वर्षाच्या आतील जनावरे हि एक वर्षांचीच असणे आवश्यक आहे. अन्यथा ती जनावरे पुढील गटात सामील केली जातील व ते ठरविण्याचा अंतिम निर्णय निवड समितीकडे राहील. 
  • परीक्षण रिंगणामध्ये जनावरे आणताना सोबत दोनच व्यक्ती असणे आवश्यक आहे, तिसरा व्यक्ती चालणार नाही.
  • प्रवास खर्च व बक्षिसाची रक्कम बँक खात्यावर जमा केली जाईल.
  • कोल्हापूर परिक्षेत्रापासून 50 किमी च्या वरील स्पर्धकांना RTO च्या नियमानुसार प्रति किमी दराने एक बाजूचे गाडी भाडे (वाहतूक खर्च ) दिला जाईल. 
  • स्पर्धकांनी सोबत येताना आधारकार्ड पॅन कार्ड व बँक खाते पासबुक, दोन आयडेंटीटी कार्ड साईज फोटो व गाडीच्या कागदपत्रांची झेरॉक्स आणणे बंधनकारक राहील.
  • आपल्या घोड्यांचे खाद्य आपण घेऊन यावे येथील घोड्यांचे खाद्य कॉम्प्लिमेंटरी आहे 
  • घोडे स्पर्धेला आणताना घोडे फिट असल्याचे सर्टिफिकेट पशुवैद्यकांकडुन घेऊन यावे.
  • घोड्यांची  CBC रक्त तपासणी केलेली असावी.
  • स्पर्धकांनी सोबत येताना जनावरांचे खाद्याचे टब, पाण्याची बादली, मेक, खुट्टी, दोरी, चारा व इतर लागणारे साहित्य बरोबर घेवून येणे बंधनकारक असेल.
  • दि. 21,22, 23 रोजी जनावरांना चारा, पशुखाद्य, श्वानांसाठी व मांजरांसाठी लागणारे खाद्य व पाण्याची सोय केलेली आहे.
  • संपूर्ण स्पर्धेत पंचांनी दिलेले निर्णय अंतिम असतील त्यासंदर्भात कोणताही दावा करता येणार नाही.
  • स्पर्धकांनी आपल्या  जनावरांसोबत राहणे बंधनकारक राहील. कोणत्याही परिस्थितीत जनावराला एकटे सोडता येणार नाही व जनावरास अशा परिस्थितीत काही अघटित झाल्यास त्याला व्यवस्थापन जबाबदार राहणार नाही.
  • प्राथमिक उपचारांसाठी स्वतंत्र पशुवैद्यकांची टीम तत्पर असेल
  • स्पर्धेपूर्वी एक दिवस म्हणजे २० फेब्रुवारीला संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सर्व स्पर्धकांनी स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित असणे बंधनकारकर राहील. 
  • स्पर्धेसाठी येताना जनावरांचे (गाय व बैल गट) लम्पीचे लसीकरण प्रमाणपत्र  घेऊन येणे आवश्यक आहे, अन्यथा प्रवेश मिळणार नाही.
  • संपूर्ण स्पर्धा श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र कणेरी, कोल्हापूर व पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या अखत्यारीत राहील.