Panch Mahabhoot - Five Elements

Fire Gallery

अग्नी तत्व( ऊर्जा)

पंचतत्वात एक अग्नी तत्व आहे. मानव शरीरातील रचनेत अग्नी तत्व खूप प्रभावशाली आहे. अग्नी बऱ्याच रूपात जीवनाचे प्रतिनिधित्व करते. तुम्ही जिवंत आहात की नाही याचे मोठे लक्षण तुमच्यात अग्नी काम करत आहे की नाही म्हणजेच तुमचे शरीर गरम आहे की थंड पडलेय, हे होय. ह्या पृथ्वीतलावरील जीवनास सूर्याकडून शक्ती मिळते. भारतात आपण देवाजवळ दिवा लावतो त्यासाठी तूप, तीळ किंवा भुईमुगाचे तेल याचा दिवा लावतो. ही परंपरा भारतीय कुटुंबाचा एक अविभाज्य भाग आहे ह्या दिव्यामुळे घरात आकाशी क्षेत्र तयार होते. अग्नी तत्व हे सर्व घटनांचे मूळ आणि अंत आहे .पवित्र अग्नीने सर्वात प्राचीन काळापासून आध्यात्मिक विधी आणि परंपरावर प्रभाव टाकला आहे. अग्नी संसारिक आणि दिव्य दोन्ही आहे.

तुम्ही येथे ऑडिओ ऐकू शकता

होम हवन किंवा यज्ञ

भारतीय संस्कृतीमध्ये अग्नी महत्त्वपूर्ण आहे. अग्नीशिवाय आपण पूजा, आरती, लग्न,गृहप्रवेश इत्यादी महत्वपूर्ण कार्य करू शकत नाही. वैदिक काळापासून हवन दैनंदिन कार्यक्रमातील महत्त्वाचा विधी आहे. वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळे यज्ञ केले जातात. यज्ञवेदी नेहमी मध्यावर केंद्रित असते पुजारी आणि इतर मुख्य लोक समारंभात अग्नीच्या चारी बाजूला बसतात. मुलाच्या नामकरणाच्या वेळी, धनसंपत्ती आणि भरभराटीसाठी, याशिवाय शुद्धीकरण विधी,संकल्प विधी व एखादी व्यक्ती त्यागाची शपथ घेते त्यावेळी यज्ञ केले जातात. वातावरण आणि भक्त जो यज्ञ करतो त्याच्या अंत:करणाची शुद्धी यज्ञकर्माने व मंत्रोच्चाराने होते. होळी,लाहोडी सारख्या सणात अग्नीची पूजा केली जाते. रथसप्तमी, सूर्य षष्ठी सारख्या व्रतात सूर्यदेवतेची आराधना करतात. तर दिवाळी सण प्रकाशाचा उत्सव म्हणून साजरा करतात.
शरीरातील प्रमुख जठराग्नी व इतर बारा अग्नी हे पचनाचे कार्य करतात. हे सर्व अग्नी तेज महाभूताचेच प्रतिक होय. अन्नाचे पचन करून यापासून शरीरातील अन्य घटकांची निर्मिती ह्या अग्नीकडून होते. हे अग्नी नाभीच्या केंद्रस्थानी केंद्रित आहेत. जे दीर्घ श्वासाने उत्तेजित झाल्यावर शरीरात वरच्या दिशेने प्रचलित होऊन मन आणि शरीर दोन्हीच्या अशुद्धता नष्ट करतात.

होम हवन किंवा यज्ञ

तुम्ही येथे ऑडिओ ऐकू शकता

अग्नी ची निर्मिती

मानवी उत्क्रांतीच्या अभ्यासात अग्नीचा शोध अतिशय महत्त्वाचा आहे. विविध नैसर्गिक कारणांनी लागलेल्या आगीमुळे आदिमानवाला अग्नीची ओळख झाली. अग्नी निर्मितीचे तंत्र मनुष्यास प्रथम अवगत झाल्याचा क्षण हा मानवी प्रगतीचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा होय. मुख्यत्वे अग्नी निर्मितीची तीन तंत्रे तेव्हा वापरली गेली, ती म्हणजे घर्षण, आघात व बहिर्गोल तून ज्वालाग्रही वस्तूवर उष्ण सूर्य किरणे एकवटणे. वाळक्या कडक लाकडांचा घुसळ दांडू व लाकडाचा पाठ यास अरणी म्हणतात. त्याच्या घर्षणाने अग्नी तयार होतो.
वीज व पेट्रोल , डिझेल व खनिज तेल इ.सारखी साधने ऊर्जा निर्मितीसाठी वापरली जातात. या व्यतिरिक्त सौर,पवन,जलविद्युत, थर्मल, बायो मास, जैव इंधन इत्यादी अपारंपरिक साधने आहेत.

तुम्ही येथे ऑडिओ ऐकू शकता

घरगुती उपयोग

घरगुती उपयोग
घरगुती उपयोग

अग्नीचा स्वयंपाक घरात प्रभावी उपयोग होतो. अन्न शिजवण्यासाठी, घर प्रकाशित करण्यासाठी अग्नीचा उपयोग होतो. पूर्वी घरात घराला प्रकाशित करण्यासाठी पणती, समई, कंदील व चिमणी यांचा उपयोग व्हायचा, त्यासाठी तेल, घासलेट इत्यादीचा वापर व्हायचा पण आता विजेमुळे ह्याची जागा ब्लब, ट्यूबलाईट यांनी घेतली आहे. विजेमुळे घरात बरी चूक करणे वापरता येतात पंखा, शिवण मशीन, मिक्सर, वाशिंग मशीन, वॅक्युम क्लिनर, ओवन, खेळणी व संगणक इत्यादी. पूर्वीच्या काळी स्वयंपाक घरात स्वयंपाकासाठी लाकडं कोळसा वगैरेचा वापर करायची आता स्वयंपाकासाठी गॅस व विजेच्या शेगडीचा वापर केला जातो.

तुम्ही येथे ऑडिओ ऐकू शकता

औद्योगिक उपयोग

औद्योगिक क्षेत्रात पण अग्नीचा वापर भरपूर प्रमाणात केला जातो अग्नीच्या वापरामुळे मानवाने औद्योगिक प्रगती केली आहे. वेगवेगळी उत्पादने जशी लोखंडाची उपकरणे, अनेक प्रकारची रसायने तयार करण्यास अग्नीचा पुरेपूर वापर होतो. जर अग्नी तत्व नसते तर मानवाने यांत्रिक व चिकित्सा क्षेत्रात इतकी प्रगती केली नसती.

औद्योगिक उपयोग

तुम्ही येथे ऑडिओ ऐकू शकता

शेतीसाठी उपयोग

शेतीसाठी ऊर्जा फार महत्वाची आहे.शेती ही मुख्यत्वे सूर्यप्रकाशावर अवलंबून आहे. सूर्यप्रकाशात प्रकाश संश्लेषण क्रिया होऊन पिकांसाठीचे अन्न तयार होते. उगवलेले धान्य उन्हात वाळवले जाते. त्यामुळे धान्य अधिक टिकते. पिकांना पाणी देण्यासाठी हल्ली विजेची मोटर वापरतात.

अग्नीचे दुष्परिणाम

अग्नीचे दुष्परिणाम
अग्नीचे दुष्परिणाम

तापमान वाढीमुळे किंवा नैसर्गिक कारणांमुळे जंगलात वणवा पेटतो. वणव्यामुळे वृक्ष व प्राणी यांचा विध्वंस होऊ शकतो. अग्नी घरे, कारखाने नष्ट करते. आगीमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड सोडला जातो. अश्या आगींचे परिणाम दीर्घकाळ टिकणारे असतात.
ऊर्जेचा अतिवापर नैसर्गिक साधन संपत्ती नष्ट करतो. इंधनांच्या वापरातून वायू प्रदूषण होते. जागतिक तापमान वाढीला कारणीभूत होते. त्यातून अनेक जटील समस्या उभ्या राहिल्या आहेत.

तुम्ही येथे ऑडिओ ऐकू शकता

हरित ऊर्जा

हरित ऊर्जा म्हणजे निसर्गाला हानी न पोचवता नैसर्गिक साधनांपासून तयार होणारी ऊर्जा. हरित ऊर्जा सौर,पवन,भू औष्णिक, बायोमास आणि जलविद्युत ऊर्जा यातून येते. यातील प्रत्येक तंत्रज्ञान वेगवेगळ्या प्रकारे काम करते. हरित उर्जेद्वारे प्रदूषण होत नाही. हरित ऊर्जेचे सहा सर्वात सामान्य प्रकार असे आहेत.

सौर ऊर्जा

सौरऊर्जा म्हणजे सूर्यापासून मिळवलेली ऊर्जा. सूर्य हा पृथ्वीवरील प्रमुख नैसर्गिक ऊर्जास्रोत आहे. ही सोलर पॅनल द्वारा तयार केली जाते. पॅनल सूर्यप्रकाश ग्रहण करतात आणि विजेमध्ये बदलतात. सौर ऊर्जेचा वापर इमारती प्रकाशमान करण्यासाठी आणि गरम पाण्यासाठी तसेच स्वयंपाकासाठी देखील केला जातो. सौर ऊर्जा सध्या बागकाम, घरगुती वापरासाठी परवडणारी आहे. सौरऊर्जेचा विचार केला असता एका तासात पृथ्वीवर पडणारी सौरऊर्जा ही रूपांतरित केल्यास आपली एका वर्षाची ऊर्जेची गरज भागवण्यासाठी पुरेशी असते, मात्र हे प्रत्यक्षात आणण्यासाठी आणखी बऱ्याच संशोधनाची आवश्यकता आहे.

सौर ऊर्जा

पवन ऊर्जा

पवन ऊर्जा

ही ऊर्जा खूप उंचीच्या ठिकाणांसाठी उपयुक्त आहे.पवन ऊर्जा तयार करण्यासाठी पवनचक्कीचा वापर केला जातो. ज्यामुळे वायूतील गतिशील ऊर्जा यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतरीत होते.पवन ऊर्जा ही अक्षय्य ऊर्जा आहे आणि ती सहजासहजी उपलब्ध करून घेता येते. ही ऊर्जा अत्यंत सुरक्षित आणि किफायतशीर आहे. पवन ऊर्जेमुळे वायू प्रदूषण व जल प्रदूषण होत नाही.

जलविद्युत

पडणाऱ्या पाण्यापासून किंवा वेगाने वाहणाऱ्या पाण्यापासून मिळणारी शक्ती (ऊर्जा) याला जलविद्युत म्हणतात. प्राचीन काळापासून पाणचक्की वापरून जलशक्ती मिळविली जात आहे. ही ऊर्जा हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर म्हणून ही ओळखली जाते. या प्रकारच्या हरित ऊर्जेच्या निर्मितीसाठी नद्या, धरणे, धबधबे किंवा इतर पाण्याच्या प्रवाहाचा वापर करतात. आधुनिक युगात पाण्याच्या उर्जेपासून वीज तयार केली जाते, जी दूरवर पाठविली जाऊ शकते आणि अनेक प्रकारे वापरली जाऊ शकते.

जलविद्युत

सागरी ऊर्जा

सागरी ऊर्जा

सागरी ऊर्जेचा ऊर्जा बाजारातील सर्वात कमी वाटा आहे. भरतीची शक्ती आणि लहरी शक्ती, हे दोन्ही विकासित होत आहे. फ्रान्स आणि दक्षिण कोरियामधील दोन भरतीची शक्ती प्रणाली जागतिक उत्पादनाच्या ९०% ऊर्जा बनवतात. छोट्या सागरी ऊर्जा उपकरणे पर्यावरणाला कमी धोका निर्माण करत असताना, मोठ्या उपकरणांचे परिणाम माहित नाहीत.

तुम्ही येथे ऑडिओ ऐकू शकता

ज्वालामुखी

ज्वालामुखीचा उद्रेक हि एक भौगोलिक घटना आहे.पृथ्वीच्या पृष्ठभागाखालील तप्त शिलारस (मॅग्मा), उष्ण वायू, राख इत्यादी बाहेर पडतात. ज्वालामुखी हा पृथ्वीवरील निसर्गनिर्मित आपत्ती आहे.ज्वालामुखी उद्रेकाच्या वेळी लाव्हारस एखाद्या नळीसारख्या भागातून बाहेर पडतो ,तेव्हा त्यास केंद्रीय ज्वालामुखी म्हणतात.
या क्रियेत ज्वालामुखीतून बाहेर पडलेले पदार्थ नळीच्या मुखाभोवती साचतात .त्यामुळे शंकूच्या आकाराच्या ज्वालामुखीय पर्वतांची निर्मिती होते.ज्वालामुखी उद्रेकाच्या वेळी लाव्हारस ज्या वेळेस अनेक भेगातून बाहेर पडतो , त्यास भेगीय ज्वालामुखी म्हणतात .या क्रियेत ज्वालामुखीतून बाहेर पडणारे पदार्थ भेगांभोवती साचतात .त्यामुळे ज्वालामुखीत पठाराची निर्मिती होते.

valcano

इटली मधील ज्वालामुखीचा प्रसंग

इटली मधील ज्वालामुखीचा प्रसंग

इटलीच्या लोकांनी ऐकले होते की त्यांच्या देशाच्या माउंट व्हेसुव्हियसचा कधीतरी उद्रेक झाला होता, त्यातून आग निघाली होती. त्या घटनेला हजारो वर्षे उलटून गेली होती आणि ऊन, वारा, पाऊस इत्यादींमुळे डोंगर उतार व माथा हिरवळीने झाकली होती. त्याच्या पायथ्याशी पोम्पेई आणि हर्क्युलेनियम सारखी इतिहास-प्रसिद्ध शहरे विकसित होत होती.
त्यानंतर एक घटना घडली. २४ ऑगस्ट १९७९ च्या दुपारी व्हेसुव्हियसच्या तोंडातून पांढरा धूर निघू लागला. पृथ्वीचा थरकाप वाढला आणि गडगडाटासह मोठा स्फोट झाला. लाव्हा, राख, धूळ आणि दगडांचा पाऊस पडू लागला. आकाश काळ्याकुट्ट ढगांनी भरले होते. शहरांच्या इमारती काही वेळातच कोसळल्या. सर्वत्र आगीचे लोळ उठले. अनेक लोक मरण पावले. जागच्या जागी दगड होऊन गेले. पंपाईमध्ये एकूण लोकसंख्येच्या १/१० लोक (सुमारे दोन हजार) जगू शकले. डोंगराच्या बाजूने येणार्‍या चिखलाने शहरे झाकली. दोन्ही शहरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. शेकडो वर्षांनंतर देशातील जनता ती शहरे कुठे होती याचाही विसर पडला. पृथ्वीच्या विविध भागात अशा घटना घडल्या आहेत आणि भविष्यातही घडत राहतील. आपण त्यांना ज्वालामुखी किंवा ज्वालामुखी उद्रेक म्हणतो.

आपण काय करू शकतो?

  • घर थंड ठेवण्यासाठी ए. सी, कूलर किंवा पंख्या ऐवजी नैसर्गिक वाऱ्याचा उपयोग करावा. ज्या भागात कोरडा व गरम वारा वाहतो त्या भागात घरांतील दारे व खिडक्या यांना वाळ्याचे पडदे लावून पडद्यावर पाणी शिंपडण्याची व्यवस्था करावी. ओल्या पडद्यातून बाहेरचा कोरडा व गरम वारा आत आला म्हणजे बाष्पीभवनाच्या क्रियेमुळे तो थंड होतो. त्यामुळे उन्हाळ्यात आल्हाददायक वाटते.
  • इंधनाचा व वीजेचा कमीत कमी वापर करावा. याने नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास कमी होईल.
  • सौर ऊर्जा व पवन ऊर्जा यासारख्या हरित ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करावा.
  • अग्नी किंवा ऊर्जा याविषयी कृतज्ञता ठेऊन त्याचे रक्षण करणे ही आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. तिचे पालन करूया.