निसर्गाचा समतोल ढासळलाय.

त्यामुळे पर्यावरण रक्षण आता संपूर्ण मानवजातीचे प्रमुख कर्तव्य बनले आहे.

याबाबत जागृती करण्यासाठी श्री सिद्धगिरी महासंस्थानच्या वतीने प. पू. काडसिद्धेश्वर महाराजांच्या मार्गदर्शनाखाली वसुंधरा नगरी, कणेरी मठ येथे दि. २० ते २६ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत 'सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव' आयोजित केला आहे.

परिषद, प्रदर्शन, प्रवर्तन हे या लोकोत्सवाचे स्वरूप आहे.

19 फेब्रुवारी - महाशोभायात्रा, पंचगंगा आरती
20 फेब्रुवारी - शुभारंभ
21 फेब्रुवारी - युवा संवाद (आकाश)
22 फेब्रुवारी - उद्योग क्षेत्र (वायू)
23 फेब्रुवारी - संत उत्सव (अग्नी)
24 फेब्रुवारी - महिला उत्सव (जल)
25 फेब्रुवारी - कृषी उत्सव (पृथ्वी)
26 फेब्रुवारी - सांगता सोहळा

वरील आठ दिवस विविध विषयांसाठी समर्पित आहेत.

या ळोकचळवळीमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याला हे सस्नेह निमंत्रण.

सर्वजण हा लोकोत्सव चिरंतन आणि यशस्वी बनवू या.

धन्यवाद