Panch Mahabhoot - Five Elements

Earth Gallery

Earth Element

We call Earth as our mother. She nourishes and sustains all living beings on her. The existence of all living beings depends on the nourishing environment, food, and water provided by the Earth. The hard parts of the human body like teeth, nails, and bones are made of Earth element.

The formation of the Earth happened with the help of the Sun. It took 1 to 2 billion years for the Earth to form. The age of our Earth is about 4.5 billion years old. The Earth is a hot ball of gas and dust, and it was through volcanic eruptions and the release of water vapor that the Earth's atmosphere was formed. Over time, the cooling of water vapor led to the creation of oceans and seas. The external layer of the Earth became cool due to the humidity in the environment.

The Layers of the Earth

The Earth itself was spinning and rotating, and gradually became cool. At that time, the outermost layer of the Earth became cold first.

Lithosphere:

The first and outermost layer is made of rocks and soil, and it is called the crust. The Earth's crust is also known as the lithosphere.

Atmosphere:

The second layer is the atmosphere, which is cold, dense, and rocky in nature.

Outer core:

The third layer is the outer core, which is composed of molten lava.

Inner core:

The fourth layer is the inner core, which is still extremely hot, and is believed to be made up of a solid ball of iron and nickel.

The Rotating Earth

As the Earth orbits around the Sun, it also rotates on its own axis. The Earth completes one full rotation on its axis in 23 hours, 56 minutes, and 4.099 seconds. The speed at which the Earth rotates is not apparent to us because we are connected to its surface. However, we are also moving along with the Earth's rotation. Therefore, we do experience the effects of its rotation. This is why the part of the Earth that faces the Sun experiences day while the part facing away experiences night.

Various minerals and rocks

Types of rocks

Igneous rocks / igneous rocks / original rocks

When the volcano erupts, the lava cools and solidifies under the ground, and rocks are formed. These rocks are called igneous rocks. Most of them are hard, heavy, and appear to be uniform. No fossils are found in igneous rocks. For example, basalt, granite.

Sedimentary rocks / aquatic rocks

Due to the constant temperature, the rocks are weathered by various differences. These particles of rocks are carried by the flow of rivers, glaciers, and floods. They settle on top of each other and a huge pressure is created at the bottom. This pressure creates a compact layer, and sedimentary rocks are formed from it. Fossils are found in sedimentary rocks. These rocks are generally light and porous. For example, sandstone, limestone, shale, and conglomerate.

Metamorphic rocks -

Volcanic eruptions and other geological movements cause continuous pressure and temperature changes in the earth. At the same time, high pressure and temperature are generated on the nearby igneous and sedimentary rocks. As a result, the original natural form and chemical properties of these rocks change. That is, the rocks are transformed. Rocks made in this way are called metamorphic rocks.

Minerals

Various metals and chemicals are obtained from minerals. Some chemicals are used to prepare medicines. Two main categories of minerals are obtained from their use: metallic minerals and non-metallic minerals. Metallic minerals are primarily used to obtain various types of metals, such as iron, bauxite, and so on. Non-metallic minerals are used to prepare chemicals, such as gypsum, salt, calcite, and so on. Increasing amounts of mining are done to meet the demands of our growing population. This is depleting the earth's natural resources. Excessive mining is causing large amounts of soil erosion.

Formation of Soil

Soil is formed due to various factors such as temperature, rainfall, and wind. Water seeping through the cracks in the soil dissolves and removes the minerals from it. The fine particles of soil erode and wash away with the water leaving the soil coarse and uneven. The soil becomes loose and brittle and later crumbles into smaller pieces. This is how the soil is formed. Organic matter such as plant roots, animal remains, and other residues mix with the soil and help to improve its fertility. The formation of soil primarily depends on the factors such as the parent material, climate, organic matter, topography, and time. Different regions have different types of soil formation

Various types of soil
Soil according to their color:
  • Black
  • White
  • Red
  • Brown
  • Gray
  • Yellow
Soil according to their taste:
  • Sweet
  • Sour
  • Salty
  • Bitter
  • Pungent
  • Astringent

Various geographical regions in India

India India is a region rich in geographical diversity. The Himalayas run through one side of India, while on the other side, a coastline of about three sides extends from Gujarat to West Bengal. Rajasthan's desert, the plains of the northern region, the Western Ghats starting from Maharashtra and extending to Kerala, the Eastern Ghats spreading from the Mahanadi delta to the Nilgiri Mountains, the dense forests of the eastern states, the Deccan plateau, Andaman and Nicobar Islands, Lakshadweep Islands, and the Aravalli mountain range represent the diversity of India. Its major regions are divided into the following six parts:

किनारपट्टी प्रदेश
पश्चिम घाट
हिमालय पर्वतीय भूभाग
वाळवंट
मैदानी प्रदेश
पठार

भारतातील जैव विविधता

भारतातील जैव विवि
घरगुती उपयोग

जैवविविधता म्हणजे वृक्ष, प्राणी, पशू , पक्षी, जलचर, उभयचर, कीटक , जीव, जंतू इत्यादी सर्व सजीवांचे वेगवेगळे प्रकार, प्रत्येक प्रकाराच्या वेगवेगळ्या जाती आणि जातीमधील संपन्नता. जैवविविधता पृथ्वीवर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी आहे. एवढेच नव्हे तर एकाच प्रदेशामध्ये सुद्धा सजीवांमध्ये  सारखेपणा आढळून येत नाही. त्या भागातलं तापमान, पडणाऱ्या पावसाचे प्रमाण, समुद्रसपाटीपासूनची उंची , प्रदेशाचे वैशिष्टय, सभोवती असलेल्या इतर सजीव अस्तित्व यावर ही जैवविविधता  अवलंबून असते. ज्या भागात भरपूर झाडे, स्वच्छ पाणी, शुध्द हवा, रासायनिक पदार्थानी खराब न केलेली जमीन असते; त्या भागात जैव विविधता जास्त असते. असा भाग माणसाच्या राहण्यासाठी अधिक चांगला. पण वाढत्या शहरांमुळे प्रचंड प्रमाणात वृक्षतोड झाली. त्यामुळे कित्येक पशू, पक्षी, जीवांचे घरच नाहीसे झाले. हवा,पाणी व मातीच्या प्रदूषणामुळे तिथले जीव धोक्यात आले. जागतिक तापमान वाढलं आहे. या सर्व बदलांमुळे जैव विविधता नष्ट होत आहे. थोडक्यात पृथ्वीवरचे आपले शेजारी हळूहळू कमी होत आहेत. हे मानवाच्या भविष्यासाठीही धोकादायक आहे. आपण जीव शृंखला म्हणजेच अन्न साखळीचा एक भाग आहोत. आपल्याला जगायचं असेल तर सर्वांना जगवावं लागेल. 

जमिनीचे गुणधर्म

जमिनीचा निम्मा भाग घन असतो. त्यापैकी ४५% भागात  खनिज पदार्था तर  उरलेला ५% भाग जैविक घटकांचा असतो. जमिनीतील कणांमध्ये जी मोकळी जागा राहते त्यात २५% हवा २५% पाणी असते. हे प्रमाण बदलत राहते.

भौतिक गुणधर्म - मातीच्या कणांचा आकार , त्याची पाणी धरून ठेवण्याची क्षमता, प्राणवायू शोषून घेण्याची क्षमता, सूर्यप्रकाश धरून ठेवण्याची क्षमता हे मातीचे भौतिक गुणधर्म आहेत. 

रासायनिक गुणधर्म - अन्नधान्यात जी जीवनसत्वे, पोषकमूल्ये असतात ती मातीतून आलेली असतात. कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, सोडियम, पालाश, लोह, स्फुरद, अल्युमिनियम, गंधक, क्लोरीन व नत्र इत्यादी मातीतील रासायनिक घटक आहेत. त्यापासून हि जीवनसत्वे अन्नात येतात. 

जैविक गुणधर्म - जमिनीत विविध प्रकारचे लहान व मोठे सजीव राहतात. ह्या सजीवांचे पोषण जमिनीत होते. काही सजीव जमीन भुसभुशीत करतात तर काही जिवाणू पिकांचे अन्न तयार करतात. जमिनीत असणाऱ्या पिकांच्या आणि प्राण्यांच्या अवशेषांचे विघटन हे सजीव करतात. यातून जमिनीचे जैविक गुणधर्म तयार होतात. 

मातीची धूप का व कशाप्रकारे होते ?

अशी ही माती वाहणारा वारा व वाहते पाणी यांबरोबर वाहून जाते त्याला आपण मातीची धूप झाली असं म्हणतो.  झाडांची मुळे माती धरून ठेवतात. झाडे वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग कमी करतात. मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याने मातीची धूप होण्याचे प्रमाण वाढले आहे. डोंगर फोडून रस्ते बांधणे व खाणकाम यानेही मातीची धूप होत आहे. 

मातीच्या धुपेचे दुष्परिणाम

मातीची धूप झाल्याने त्यातील सुपीकता व कस निघून जातो. लागवडी खालील क्षेत्र कमी होऊ लागते. हवेतील मातीचे प्रमाण वाढल्याने हवा दूषित होते तर माती पाण्यात मिसळल्याने पाणी पिण्यायोग्य राहत नाही.

जमिनीची धूप रोखण्यासाठी उपाययोजना 

शेतातील मातीचे संधारण करण्यासाठी शेतात बांध घालणे, बांधावर योग्य प्रमाणात झाडे, झुडपे लावणे हे उपाय आहेत. उतार असलेल्या डोंगराळ भागात सलग समतल चर खणले जातात. जेणेकरून उंचीवरून येणाऱ्या पाण्याचा वेग कमी होतो पर्यायाने सोबत वाहून आणल्या जाणाऱ्या मातीचे प्रमाण कमी होते. तसेच पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. झाडांची मुळे माती धरून ठेवत असल्याने मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करणे गरजेचं आहे. 

जमिनी खराब होण्याची कारणे

औद्यागिक व घरगुती सांडपाणी प्रक्रिया न करता आहे तसे जमिनीमध्ये सोडले जाते त्यामुळे माती प्रदूषण होते. वाढते शहरीकरण, वाढती कारखानदारी यांच्यामुळे टाकाऊ विषारी पदार्थाची विल्हेवाट लावता येत नाही. ती जमिनीत लावावी लागते. काँक्रीटीकरणातून जमीन खराब होते.

जमीन खराब (नापीक ) होण्याची कारणे

वाढती लोकसंख्येला अन्न, वस्र पुरवण्यासाठी जास्त पीक काढण्याच्या प्रयत्नात शेतीमध्ये रासायनिक खते, जंतुनाशके व तणनाशक यांचा वापर वाढला आहे. त्यामुळे जमीन नापीक होत चालली आहे. शेतात जाळलेला कचरा यामुळे जमिनीखाली असलेले जीव जंतू मरतात. अतिरिक्त जलसिंचनही मातीचा कस कमी करते. 

वाढती लोकसंख्येच्या गरजा भागवायला जमीन अपुरी पडते.

जमिनीचे आरोग्य जपण्यासाठी उपाययोजना व आव्हाने

सुपीक जमीन हो निसर्गाची एक देणगी असून तिची योग्य काळजी घेतल्यास ती एक चिरकाल ठेव आहे. सुपीकता व उत्पादनक्षमता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.  पिके जी पोषणमूल्ये जमिनीतून घेतात. ती जमिनीत परत जाण्यासाठी  उपाययोजना कराव्या लागतात. जमिनीची सुपीकता वाढवण्याचे अनेक उपाय आहेत. त्यापैकी शाश्वत असे नैसर्गिक उपाय करणे गरजेचे असते. 

सेंद्रिय खते

जनावरांचे मलमूत्र आणि पिकांचे अवशेष, काडीकचरा यांच्या विघटन क्रियांमध्ये जो सेंद्रिय पदार्थ तयार होतो त्यास सेंद्रिय खत असे म्हणतात.अशा सेंद्रिय खताचे आकारमान जास्त असते. सेंद्रिय खतांमध्ये शेणखत, कंपोस्ट खत, सोनखत, हिरवळीचे खत, सांडपाणी व मैल्यापासून मिळणारे खत इत्यादींचा  समावेश  होतो.

१. जीवामृत

अत्यंत चांगले असे बुरशी नाशक, विषाणू नाशक आहे. जीवामृत तयार करण्यासाठी ५०-२०० लिटर पाणी व दहा किलो ताजे शेण, दहा लिटर जुने गोमूत्र, एक किलो काळा गूळ, एक किलो कोणत्याही कडधान्याचे पीठ, एक किलो ताजे-चांगले लागलेले दही मिश्रण मिसळावे. २० मिनिटे ढवळावे. हे मिश्रण सात दिवस आंबवावे. अधुन मधुन ढवळावे. चौथ्या दिवसापासून ते सातव्या दिवसापर्यंत फवारावे. सात दिवसांत पिकांना देण्यासाठी वापरावे. एक एकरला 200 लिटर पुरेसे होते.

१०० किलो देशी गायीचे शेण किंवा ५० किलो देशी गायीचे व ५० किलो बैलाचे शेण, १ किलो गुळ किंवा ३ लि. ऊसाचा रस, १ किलो बेसन हे मिश्रण चांगले फावड्याने मिसळा, सावलीत ढीग करा व गोणपाटाने झाका. ४८ तास सावलीत असू द्या ऊन व पाऊस त्यावर पडू नये. यानंतर उन्हात वाळत ठेवा. हे मिश्रण वाळल्यानंतर त्याला बारीक करून घ्या व पोत्यात भरून ठेवा. हे मिश्रण १ वर्षा पर्यंत वापरता येईल. मातीत घनजीवामृत नांगरणी वेळी चांगल्या प्रकारे मिसळल्यास जमिनीची सुपीकता अधिक चांगल्या पद्धतीने होते. कुठलीही कीड व रोग शेतीत होत नाहीत.

अमृतपाण्यामुळे पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता पण वाढते. पाव लिटर तूप आणि अर्धा लिटर मध एकत्र करा आणि ते भरपूर फेटा. त्यात एक मूठ वडाच्या झाडाखालची माती टाका आणि परत फेटा.त्यात २-३ लिटर गोमुत्र आणि २-३ किलो गाईचे शेण मिसळा आणि एकजीव करा. आता हे मिश्रण तुम्ही १० ते २० लिटर पाण्यात एकत्र करा. बियांची रोपे करतांना किंवा रोपे तयार झाल्यावर किंवा रोपे जर सुकत असतील तर, वापरा. रोपांना जवळपास २१ दिवस पाणी मिळाले नाही तरी पण ती अमृत पाण्यामुळे तग धरून राहू शकतात.

वर्मीवाश(अर्क) म्हणजे गांडूळांच्या सर्वांगावरुन निथळून आलेले पाणी. त्यामध्ये मुख्य अन्नद्रव्यांसह सूक्ष्म मूलद्रव्ये अस्तित्वात असून गांडूळ अर्क सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेले आहे. अर्क पिकांसाठी सर्वोत्तम पीक वर्धक आहे. वर्मीवाश फुलोरा व फळपक्वतेच्या अवस्थेत फवारल्याने फुलगळ,फळगळ थांबवण्यास खूप मदत होते.

गाय किंवा बैल यांच्या मृत्यूनंतर त्यांची मातीमध्ये खड्डा करून समाधी बांधली जाते व ठराविक काळानंतर तेथील मिश्रण खत म्हणून शेतीसाठी वापरले जाते यालाच समाधी खत असे संभोदिले जाते. समाधी खत जैविक दृष्टया पिकांसाठी अत्यंत उपयुक्त असे खत आहे, कारण यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस , पोटॅश सारखे १६ पोषक तत्व उपलब्ध होतात. समाधी खत तयार करण्याची पद्धत खालीलप्रमाणे : गाय किंवा बैलाचा मृत्यू झाल्यानंतर जमिनीत ६ फूट लांब, ४ फूट रुंद आणि ३ फूट खोल खड्डा बनवून त्यात त्यांचे शव गाडले जाते. खडड्याच्या आतील सर्व बाजूस ताज्या शेणाने सारवून त्यामध्ये २० किलो मीठ, २० किलो चुना असे मिश्रण करून याचा जैविक खत म्हणून वापर केला जातो. ६ महिन्यानंतर त्या भागातील २ फूट माती बाजूला सारून बाकीचे मिश्रण पिकांसाठी फवारणी करून वापरू शकतो.

व्यायलेल्या गायीच्या वारा पासून बनवलेल्या अर्काला प्लेसंटा अर्क म्हणतात.

नत्र हा पिकाच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा आणि मूलभूत घटक आहे. नत्रामुळे पिकांना गडद हिरवा रंग येतो. तसेच खोडाची चांगली वाढ होते. नत्रामुळे फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम तसेच इतर अन्नद्रव्ये यांचे पिका द्वारे शोषण होते. नत्र निर्मिती पुढीलप्रमाणे करण्यात येते: ४ किलो मासळी, छोटे छोटे तुकडे करुन घ्यावेत. त्यात ४ किलो सेंद्रिय गुळ मिक्स करावा. स्वच्छ प्लास्टिकच्या डब्यात हे मिश्रण भरावे. डब्बा पूर्ण भरू नये, वर दोन इंच रिकामा ठेवावा. त्यात एक किंवा दोन चमचे युरिया घालावा. त्यामुळे माशांची हाडे विरघळण्यास मदत होते. हे मिश्रण दहा दिवस ठेवल्याने ते मधासारखे मिश्रण तयार होते. २ मिली मिश्रण १ लिटर पाण्यामध्ये मिसळून ऊस , भाजीपाला इत्यादी पिकांना १५ दिवसातून एकदा फवारावे.

पार्थेनियम कंपोस्ट हे एक संतुलित जैव खत आहे ज्यात शेतातील शेणखतापेक्षा जास्त नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश असते.

अझोलाच्या उच्च नायट्रोजन सामग्रीमुळे ते एक आदर्श जैव खत बनते.

दही तयार झाल्यानंतर, तांबे किंवा पितळाचा चमचा त्या भांड्यात 10-15 दिवस घातला जातो.रंग बदलल्यानंतर हे मिश्रण पाण्यात मिसळून फवारावे.

स्फुरद मुळे बीज अंकुर लवकर फुटतात. तसेच मुळ्या, फुले, फळे लवकर येतात. द्विदल पिकातील मुळावरील गाठीची संख्या वाढते. स्फुरद मुळे पिकातील दाण्याची संख्या वाढते. स्फुरद निर्मिती पुढील प्रमाणे : एक किलो गायीच्या हाडांचा जाळून केलेला कोळसा १० लिटर पाण्यात १० दिवस ठेवावा. यातील ३० मिली द्रावण १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून पंपाद्वारे फवारावे किंवा १ किलो तिळाच्या काड्या जाळून काळा कोळसा तयार करावा. १ किलो कोळसा १० लिटर पाण्यात १० दिवस ठेवावा, नंतर ३० मिली द्रावणात १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून पंपाद्वारे फवारावे.

तिळाच्या पिकाचे गवत व गोमूत्र यापासून बनवले जाते.

सोयाबीन पिकाचे गवत व गोमूत्र यापासून बनवले जाते.

२५ लिटर पाण्यात १ किलो तंबाखूच्या काड्या दहा दिवस भिजत ठेवाव्यात. १ लिटर पाणी व २ मिली गोमूत्र असे मिश्रण करून झाडांवर फळधारणेच्या वेळेस फवारावे.

२५ लिटर पाण्यात १ किलो बेलाचे फळ दहा दिवस भिजत ठेवाव्यात. १ लिटर पाणी व २ मिली गोमूत्र असे मिश्रण करून झाडांवर फळधारणेच्या वेळेस फवारावे.

२५ लिटर पाण्यात १ किलो बेलाचे फळ दहा दिवस भिजत ठेवाव्यात. १ लिटर पाणी व २ मिली ताक असे मिश्रण करून झाडांवर फळधारणेच्या वेळेस फवारावे.

केलेल्याच्या खोडापासून तयार केलेला अर्क पिकांच्या वाढीसाठी उत्तम आहे.

शेतीसाठी, कचरा एन्झाइमचा वापर सेंद्रिय खत आणि सेंद्रिय कीटकनाशक म्हणून केला जातो. हे सेंद्रिय कीटकनाशक म्हणून देखील वापरले जाते आणि हवा शुद्ध करते.

पंचगव्य बनवण्यासाठी प्रथम देशी तूप शेण आणि मूत्रात मिसळून जाड प्लास्टिक किंवा काँक्रीटच्या टाकीत टाकावे. नंतर त्यात दही, दूध आणि गूळ घालून हे मिश्रण लाकडी दांडक्याने पुढचे ३-४ दिवस ढवळत राहावे आणि मिश्रण चांगले मिसळल्यानंतर पाचव्या दिवशी टाकीत ५० लिटर पाणी भरून ते बंद करावे. सावलीच्या ठिकाणी झाकण ठेवा. आता पुढील 15-20 दिवस हे मिश्रण रोज सकाळी आणि संध्याकाळी विरघळले पाहिजे. अशा प्रकारे, सुमारे 20-25 दिवसांनी, पंचगव्य वापरासाठी तयार होईल.

हे बुरशी पासून मिळवले जाणारे पिकांच्यावाढीसाठी उत्तम असे खत आहे.

हि एक अशी पध्दत आहे ज्यात प्राण्यांची व मानवी विष्ठा तसेच इतर जैविक कचरा यांचं विघटन करून त्यापासून खतनिर्मिती केली जाते.

कृषी कचरा , खत, नगरपालिका कचरा, वनस्पती साहित्य, सांडपाणी कचरा एकत्र यासारख्या कच्च्या मालापासून बायोगॅस तयार करता येतो. त्यातून उत्पन्न होणारी स्लरी हि खत म्हणून वापरली जाते.

गोशाळेतून मिळणारे शेण व गोमूत्र सेंद्रिय खतांमध्ये फार उपयोगाला येते.

कंपोस्ट केलेले कोंबडीचे खत सूक्ष्म अन्नद्रव्यांचे स्त्रोत आहेत. शिवाय ते माती दुरुस्तीचे कार्य करतात.

शेळीचे लेंडीखत हे वनस्पतीतील पोषक नायट्रोजन (N), फॉस्फरस (P) आणि पोटॅशियम (K) यांचा उत्कृष्ट स्रोत म्हणून ओळखले जाते. याशिवाय, खतामुळे सेंद्रिय पदार्थ आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर यांसारखी इतर पोषक द्रव्ये जमिनीत परत येतात, जमिनीची सुपीकता आणि गुणवत्ता वाढते. सर्व आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे जोडली जातात

सोन खत असेही या मानवी खताला नाव आहे.

नायट्रेट, जे नैसर्गिकरित्या पावसाच्या पाण्यात असते, वनस्पतींसाठी नायट्रोजनचा एक उत्तम स्रोत आहे. नायट्रोजन हा वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या प्रमुख पोषक घटकांपैकी एक आहे.

समुद्राचे पाणी खत म्हणून वापरल्याने पुढील फायदे होतात. मातीची पोषकता व घनता सुधारते. मातीमधील सूक्ष्मजीव विविधता वाढते. दुष्काळ, कीटक, प्रत्यारोपणाचा धक्का सहन करण्याची क्षमता वाढते.

१ (अंडा + निंबू)- एका भांड्यात लिंबू पिळून घ्या. त्यात अंडी ठेवा. कंटेनर घट्ट बंद करा. गूळ पाण्यात विरघळावा.थंड झाल्यावर अंडी आणि लिंबाच्या द्रावणात टाका आणि नीट मिसळा.

२ (अंडा + दुध)-

१ (गोबर कंटे रसायन)-एका ड्रममध्ये पाणी घ्यावे. या पाण्यामध्ये गोवऱ्या व गूळ टाकायचा आहे. त्यानंतर त्या मिश्रणात दही घालायचे आहे. हे मिश्रण असेच पाच ते सहा दिवस झाकून ठेवायचे आहे. प्रत्येक दिवशी सकाळी आणि संध्याकाळी हे मिश्रण आपल्याला ढवळायचे आहे. त्यानंतर सहाव्या दिवशी हे १०० लिटर चे मिश्रण त्यामध्ये १०० लिटर पाणी घालायचे आहे. त्यानंतर हे मिश्रण गाळून ड्रीपद्वारे किंवा पाण्यातून आपल्या १ एकर पिकांना द्यावी. हे मिश्रण जास्तीत जास्त ८ दिवसांमध्ये शेतीसाठी वापरावे. त्यानंतर हे मिश्रण पिकांना घालू नये. हे मिश्रण फळबागा, भाजीपाला किंवा कोणत्याही पिकासाठी वापरू शकता. महिन्यातून दोन वेळा हे पिकांना देणे फायद्याचे आहे.

२ (शेंगदाणा + एरंडी)

अझोला हे पाण्यात मुक्तपणे वाढणारे शेवाळ आहे.अझोलामध्ये प्रथिने – २५ ते ३० %, खनिजे – १० ते १५ % आणि अमिनो आम्ल – ७ ते १० % हे पोषक घटक आहेत. महाराष्ट्रात प्रामुख्याने भातशेतीमध्ये अझोलाचा वापर जैविक खत म्हणून केला जातो. अझोला हेक्टरी ४०-६० किलो नत्र स्थिरीकरण करते. अझोला हे हिरवळीच्या खतांबरोबरच दुभती जनावरे, वराह आणि बदकांसाठीही उपयुक्त खाद्य आहे.

सर्वात शक्तिशाली खत म्हणून शिंग खताला मान्यता मिळालेली आहे कारण हे कमी मात्रा टाकून जास्तीत जास्त प्रमाणात शेतीत फायदा घेऊ शकतो. शिंगखत बनविताना प्रथम मृत प्राण्याची शिंगे आतून बाहेरून स्वच्छ धुऊन घ्यावीत. त्यानंतर शिंगांच्या पोकळ भागात गाईचे ताजे शेण दाबून घट्ट भरावे. जमिनीमध्ये साधारणपणे एक फूट लांब आणि १ फूट रुंदी असलेला खड्डा करावा . त्या खड्ड्यात शिंगे गाडल्यावर त्यावर माती टाकून ६ महिन्यानंतर पुन्हा शिंगे बाहेर काढावीत. शिंगातील खत काढून घावे व पुन्हा शिंगात सिलिका पावडर टाकून पुढील सहा महिन्यासाठी जमिनीत गाडून ठेवावे . त्यानंतर ती सिलिका पावडर व पहिले खत एकत्रित मिश्रित करून पिकावर फवारावे. साधारणपणे 20 ग्रॅम मात्रा १५ लिटर पाण्यामध्ये मिक्स करून पिकावर फवारावे.

माती ,पाणी व  पीक उत्पादन यांचा संबंध

हवा, पाणी व माती हे शेतीसाठी महत्त्वाचे घटक आहेत. मातीत मिसळणारी हवा पिकाला व आर्द्रता मातीतील जिवाणू वाढीसाठी गरजेची  असते. त्यामुळे मातीतील पोषकद्रव्ये वाढतात. मातीला पाणी मिळाले की मातीतील पोषणद्रव्ये पाण्यात मिसळतात व ती मुळांद्वारे पिकात शोषली जातात. जमिनीचा कस वाढतो. या जमिनीवर सूर्यापासून मिळणारी उष्णताही परिणाम करते. अति थंड हवामानाच्या भागात शेती करता येत नाही. तर अति तीव्र उष्ण हवामानाच्या भागात ओसाड, नापीक, वाळवंटी मातीमुळे पीक घेता येत नाही. म्हणून योग्य हवामानात योग्य पाऊस मिळणाऱ्या भागात तसेच योग्य तापमानातील माती ही पिकांच्या, वनस्पतींच्या वाढीला योग्य असते. मातीतील अनेक खनिज घटक हे पिकांच्या व वनस्पतींच्या वाढीला पोषक असतात.

शेतीसाठी मातीची उपयोगिता

शेतातील माती ही केवळ खडकांचा चुरा नसून ती सजीव व क्रियाशील आहे. मातीमधून पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असे खनिज पदार्थ व जैविक घटक मिळतात. माती पिकांची मुळे धरून ठेवते. मातीतील हवेमध्ये कार्बन डाय ऑक्साईड व बाष्पाचे प्रमाण जास्त असते.जमिनीतील हवा खेळती ठेवल्याने पिकांची योग्य वाढ होते. बियांची उगवण चांगली होते. जमिनीतील सजीवांची वाढ उत्तम होते. पर्यायाने मातीची सुपीकता वाढून पीक चांगले येते.  मातीतील पाणी मातीतील पोषण द्रव्ये शोषून घेण्यासाठी मुळांना मदत करते.बी रुजून ते पीक हातात येई पर्यंत पिकाला उष्णतेची गरज असते. ती उष्णता मातीतून मिळते.

विविध वस्तू व कामांसाठी मातीची उपयोगिता

मातीपासून स्वयंपाकाची अनेक भांडी, माठ, पणत्या, कौले, विटा, कुंड्या,चुली इत्यादी  गोष्टी कुंभारकाम करून बनवतात. मातीची घरे आरोग्यासाठी खूप उत्तम असतात.

मातीचे औषधी गुणधर्म

माती बांधक, विषशोषक, उष्णताशामक, वेदनाशामक या गुणांनी युक्त आहे. माती लावून स्नान केल्याने त्वचा विकार व अस्थिविकार दूर होतात. नैसर्गिक आहार सुरू केल्यावर सर्व विकार मुळापासून नष्ट होऊ लागतात. कानदुखी, दातदुखी, संधिवातातील वेदना, मणक्याचे विकार, सायटिका विकार यातील वेदना माती पट्टी केल्यास कमी होतात.मातीचे उपचार शरीरावर केल्यास मातीतील चुंबकीय गुणामुळे शरीरातील दोष गतिमान होऊन बाहेर पडतात. मातीपासून सर्व चेतन व अचेतन पदार्थांची निर्मिती होते व शेवटी सर्व मातीमध्ये मिसळते. तसेच मातीचा रचनात्मक गुण आहे. त्यामुळे फाटलेली, कापलेली त्वचा भरून येण्यास मदत होते.

शेतातील काडी कचरा व्यवस्थापन

पिकांची धसकटे, तन, गवत पिकांचे अवशेष, काड, चावरीत निरुपयोगी पदार्थ, कापसाचे देठ, भुईमुगाचा भुसा, पाने, उसाचे पाचट, चिपाड इत्यादी काडी  कचऱ्यापासून खत तयार करता येते

जमिनीच्या समृद्धीसाठी मशागतीच्या विविध पद्धती

बैल मशागत पद्धती मनुष्य मशागत पद्धती इत्यादी 

मशागत म्हणजे शेतीची तयारी करणे, विशेषतः मागील हंगामात वाढलेले तण आणि मागील पिकांचे अवशेष काढून टाकणे. 

पारंपरिक शेती पध्दतीत बैलांच्या सहाय्याने नांगरणी, पेरणी, मळणी  इ. काम केली जातात. त्यासाठी गाय, बैल इ पशुपालन केले जाते. अश्या शेतकऱ्यांचा दुग्धव्यवसाय हा जोडधंदा होतो. शेतकर्‍यासोबत शेतमजूरही आपल्याकडे म्हैस किंवा गाय नाही तर किमान बकरी तरी पाळत होते. त्यामुळे गावात दूधदुभतं पुष्कळ असायचे. बैलांचे मलमूत्र शेतात पडून मातीचे जैविक गुणधर्म वाढत होते.

परंतु, आता यांत्रिकीकरणाच्या युगामध्ये बैलाची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे व ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतातील नांगरणी, ऊखळण, पेरणी इत्यादी कामे केली जातात. ही शेतीची मशागत करण्यासाठी लागणारा वेळ थोडा लागत असतो. परंतु यात इंधने वापरली जातात. ही अवजड वाहने शेतात फिरल्याने माती दाबली जाते.

 ग्रामवन, देववन (देवराई), राजवन, वैद्यवन

ग्राम वन : गावच्या सामाईक जागेमध्ये असलेली वनसंपदा ही ग्रामवन म्हणून ओळखले जाते. त्यातील झाडे तोडण्याची परवानगी कुणालाही नसते. 

देवराई : देवराई मधील काडीलाही हात लावायची परवानगी नसल्याने ही जंगले  जैव विविधतेने समृद्ध असत. देवराई नावाचा अर्थ देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारे वन. सहसा, अशी अरण्ये सरकारच्या वनखात्याने सांभाळलेली नसून परंपरेने समाजाने सांभाळलेली असतात. अशा देवराया भारतभर विखुरलेल्या आहेत.

राजवन : पूर्वी राजे, महाराजे यांच्या स्वतंत्र वने असत. ती  राजघराण्याची राखून ठेवलेली असत. त्यात फळबागा, फुलबागा, शिकारींसाठीची जंगले इ चा समावेश होत असे.

वैद्यवन : वैद्यांना उपयोगात येणाऱ्या औषधी वनस्पतींची लागवड या वनांतून केलेली असे. ही वनेही संरक्षित असत.  भारतीय संस्कृतीत आपण पृथ्वीला भूमाता म्हणून संबोधतो.

भारतीय संस्कृतीत आपण पृथ्वीला भूमाता म्हणून संबोधतो. पृथ्वीची अनेक रूपात पूजा करतो. गोवर्धन पूजेत पर्वताची, वेळ अमावास्येला शेतातल्या मातीची पूजा करतात. आपण भारतीय लोक वृक्षाची सुद्धा पूजा करतो.  तुळस, आवळा, वड, पिंपळ, औदुंबर, बेल, कडुलिंब, कदली (केळ्याचे झाड), अशोक, कुश (गवत ) इत्यादी पूजनाची व्रते सांगितली आहेत. कावळा, कोकिळा, नाग, हत्ती, गाय, बैल इत्यादी प्राणी,पशू व पक्षी यांचे  पूजनही आपण वेगवेगळ्या व्रतात करतो. हिंदू देवांचेही प्रत्येकी आवडते फुल,वृक्ष,वाहन म्हणून प्राणी, फळ धर्मग्रंथात सांगितले आहेत. त्यानुसार त्या सर्व गोष्टी आपोआप जपल्या जातात. सर्वांमध्ये परमेश्वर पाहिल्याने या सर्वांचे आपोआप संरक्षण होते. पर्यायाने पृथ्वीचे रक्षण होते.

वैदिक काळापासून भारतात वैज्ञानिक पद्धतीने शेती करण्याची पध्दत विकसित होत होती. ‘वृक्षायुर्वेद’ हा वनस्पती वैद्यक शास्त्रज्ञ सुरपाल यांनी लिहिलेला ग्रंथ प्रसिध्द आहे. वृक्षांचे महत्त्व, लागवडीसाठी योग्य जमिनीचे प्रकार, लागवड व वाढ, पोषण, रोग व त्यावरील उपाययोजना, काही आश्चर्यकारक वनस्पती, उदयान व्यवस्था, भूजल,वनस्पतींच्या जवळजवळ १७० प्रजातींची सुची आणि विहिरी अशी अनेक प्रकरणे या ग्रंथात आहेत. भारतीय कृषी तंत्राची माहिती आपल्याला अनेक ग्रंथातील कृषी सूक्ते, वराहमिहिरांची 'बृहतसंहिता' व काश्यपाची 'कृषीसूत्रे' या ग्रंथातूनही मिळते. या सर्व ग्रंथात संपूर्णपणे कृषी क्षेत्राला वाहिलेला व आजही उपलब्ध असलेला ग्रंथ म्हणजे 'कृषी पराशर' होय. हा ग्रंथ कृषी संदर्भ म्हणूनही ओळखला जातो. शेतीचे नियोजन, बियाणे, पशु, सर्व शेतीक्रिया, हवामानाचा अंदाज, धान्याची साठवण, शेतमालाची वाहतुक, उत्पन्नाची मोजदाद या सारखे कृषीसंबंधी

सर्व विषय या ग्रंथात हातळण्यात आले आहेत. जगातील श्रेष्ठ कृषीतज्ञ महामुनी पराशर यांनी हा ग्रंथ लिहिला आहे.

आज आपण काय करू शकतो?
  • घरात व शेतात होणारा कचरा विभागणे आणि त्याची नीट विल्हेवाट लावणे. भाज्यांची देठे,फळांची व भाज्यांची साले, धान्याची टरफले इत्यादी पासून घरच्या घरी खत तयार करणे.
  • प्लास्टिक बॉटल, आवरणे, जुने कपडे,मोडक्या वस्तू यांचा पुनर्वापर करणे. प्लास्टिक, काच यांचे रिसायकलिंग करणे.
  • घरात साफसफाई साठी रासायनिक फिनाईल, साबण , ऍसिड यांऐवजी नैसर्गिक फिनाईल, रिठा, गोमूत्र इ चा वापर करणे.
  • आपल्या प्रचंड लोकसंख्येला अन्न,वस्र,निवारा इत्यादी गोष्टी भरपूर लागतात. त्या पुरवण्यासाठी अधिकाधिक पीक उत्पादन, खाणकाम केले जाते. त्याने पृथ्वीवरील नैसर्गिक साधने संपत आहेत. म्हणून स्वतःच्या गरजा कमी ठेवणे. अन्न वाया न घालवणे. गरजेपुरती वस्र घेणे. आवश्यक असतील तेवढ्याच गोष्टी घेणे.